एकापेक्षा एक दमदार चित्रपट आणि विविध प्रकारच्या भुमिकांनी अल्पावधीत हिंदी चित्रपटसृष्टीत एक अनोखे स्थान मिळवलेली, अनुष्का शर्मा आता ‘एन एच १०’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात पदर्पण करत आहे. आज ( 13मार्च) रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेला ‘एन एच १०’ या चित्रपटात अनुष्का मध्यवर्ती भुमिकाही साकारत आहे. ‘एन एच १०’ या चित्रपटात अनुष्का अॅक्शन करताना दिसणार आहे. त्यासाठी तिनं स्वतः विशेष मेहनतही घेतली आहे. मग जाणून घ्या अनुष्काच्या बोल्ड आणि ब्युटिफूल राहण्याचा मुलमंत्र काय आहे ?
- अनुष्काचा फिट्नेस फंडा -
‘एन एच १०’ या चित्रपटाचं शुटींग हे ग्रामीण भागात झाल्याने तिथेच तिने स्वतःची जिम थाटली होती. अनुष्कासोबत आहारतज्ञ, स्वयंपाकी व फीटनेस ट्रेनर सोबतच होते.त्यामुळे अनुष्काच्या आहाराकडे आणि व्यायामाकडे जातीने लक्ष ठेवले जात होते ज्याचा फायदा अनुष्काला भुमिका निभावताना झाला आहे. मात्र एरवीदेखील अनुष्काला व्यायाम करणे आवडते. असे ती सांगते. अगदी सुरवातीच्या काळात व्यायाम न केल्याने दिवसाअखेरी थकवा जाणवायचा मात्र नियमित व्यायाम केल्यानंतर आता प्रसन्न व आनंदी वाटत असल्याचेही अनुष्कानं कबूल केले आहे.
सुरूवातीला आठ्वड्यातून चार वेळेस , अनुष्का वजन वाढवण्यासाठी विशेष व्यायाम करत होती. मात्र हिमालयात एका योगाकेंद्राला भेट दिल्यानंतर ती आता व्यायामासोबत योगसाधना देखील करते. निरोगी व सुदृढ राहाण्यासाठी अनुष्का परिपुर्ण आहार घेते. तिच्यामते, भरपूर प्रोटिन व कमीतकमी कार्बोहायड्रेट घेणे तिच्या शरिरासाठी योग्य नाही. अनुष्का चौकस आहार व रोज किमान दोन फळं खाण्यावर भर देते. मात्र आहारातील एक गोष्ट ती नाकारुच शकत नाही ते म्हणजे तिच्या आईच्या हातचं व अस्सल घरचं जेवण ! अनुष्का ‘घरगुती जेवणाची’ शौकीन आहे. जर ती घरापासुन दूर किंवा कामात नसेल तर ती आवर्जुन घरचं जेवण घेते.
- काय आहे अनुष्काच्या सौंदर्याचे रहस्य ?
पदार्पणापासुनच अनुष्काचे सौंदर्य मोहक होते. सुंदर व नितळ चेहर्यामुळे अनुष्का अनेक जाहिरतींमध्ये झळकळी. कॅमेर्यासमोर उभे राहाताना देखील तीला फरसा मेक अप लागत नाही. तसेच जो काही मेकअप करते, तो अनुष्का झोपण्यापुर्वी कटाक्षाने काढून टाकते. अनुष्काच्या या सवयीमुळे तीची त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. याचबरोबर दररोज २- ३ लिटर पाणी प्यायल्याचादेखील फायदा तिच्या त्वचेला होतो.
नैसार्गिक सौदर्यप्रसाधनांसोबतच , मध, दुध , दही, पपई अशा फळांचा फेस पॅक लावण्याला अनुष्का प्राधान्य देते. यामुळे तिच्या त्वचेची कांती वाढते. त्वचेप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठीसुद्धा अनुष्का विशेष काळजी घेते. केसांना नियमित नारळाचे तेल लावणे, केस धुण्यापुर्वी ‘हेड मसाज’ घेणे यामुळे केसदेखील चांगले राहतात.
- अनुष्का कशी घेते आरोग्याची काळजी ?
शारिरीकदृष्ट्या अनुष्का फिट आणि फाईन असली तरीही , नुकत्याच एका मुलाखतीत ती, ‘Anxiety disorder’ ने पीडीत असुन त्यावर ध्यानधारणेतून मात करत असल्याचे कबुल केले आहे. चंदेरी दुनियेत वावरताना ,अनुष्काने अशा बौद्धिक आजारांबद्दल उघडपणे बोलणे हे एक धाडसी पाऊल आहे.
पहा ‘एनएच 10′चा ट्रेलर
Video source: Eros Now/YouTube
छायाचित्र सौजन्य – Getty Images
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या